Saturday 7 September 2013

एकोणीसाव्या शतकातील नव्या संकल्पना

एकोणीसाव्या शतकात बऱ्याच नवीन संकल्पनांचा उगम होऊन एकंदर मुद्रण तंत्रामध्ये बरीच मोठी भर पडली. या संकल्पनांचा संबंध गूटेनबेर्क यांनी जे तंत्र शोधून काढले त्या तंत्राशी प्रत्यक्षपणे नव्हता; पण एकंदर मुद्रण तंत्र त्यामुळे समृद्ध झाले.

चित्रांचे निर्मितितंत्र : चित्रनिर्मितीचे अगदी पहिले तंत्र म्हणून पूर्वी काष्ठचित्रांकनाचा उपयोग केल्याचा उल्लेख केला आहे. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात धातूच्या पृष्ठावर कोरून त्यावरून मुद्रण करण्याच्या तंत्राची या तंत्राशी चढाओढ सुरू झाली. यासाठी तांबे, पितळ, जस्त आणि १८०६ नंतर पोलाद या सर्व धातूंच्या पत्र्यांचा उपयोग केला गेला. या पत्र्यांच्या पृष्ठभागावर कठीण हत्यारांनी कोरून किंवा अम्लाच्या साह्याने रासायनिक कोरण करून मुद्रणप्रतिमा खोलगट अशी तयार केली जात असे. त्या पृष्ठावर प्रथम पूर्णपणे शाई पसरून नंतर वरचा सपाट पृष्ठभाग काळजीपूर्वक पुसून काढला जात असे. खोलगट प्रतिमेमधील शाईवर एका दंडगोलाच्या साह्याने कागद दाबला जाऊन त्यावर मुद्रण होत असे. उत्कीर्ण (इंटॅग्लिओ) मद्रणाची ही पद्धत काष्ठचित्रांकनाच्या पद्धतीशी जुळत नसल्याने मजकुराचे मुद्रण व चित्रांचे मुद्रण निराळे करून नंतर नंतर पुस्तकबांधणीच्या वेळी दोन्ही एकत्र केले जाई.
क्राकार पृष्ठावरून उत्कीर्ण मुद्रण करण्यासाठी एकोणीसाव्या शतकात यंत्रे तयार केली गेली. या यंत्रामध्ये शाई लावण्यासाठी गोल रूळ व पृष्ठावरील शाई पुसण्यासाठी सतत फिरणाऱ्या कापडी पट्ट्या यांची योजना असे. या यंत्राची मुद्रणाची क्षमता बरीच मर्यादित होती. अठराव्या शतकाच्या शेवटी उत्कीर्ण मुद्रणाच्या या पद्धतीमुळे कापडावर अखंड रंगीत छपाई करण्याची एक पद्धत विकसित झाली. या पद्धतीत एक तांब्याचा दंडगोल वापरला जाई व त्यावर हाताने कोरून मुद्रणप्रतिमा तयार केलेली असे व त्याच्या पृष्ठावरील शाई एका धातूच्या पट्टीने (तासणीने) काढून घेतली जाई आणि कोरलेल्या भागातील शाई तशीच राहिल्याने ती कागदावर उतरत असे. १८६० साली फ्रान्समध्ये हीच पद्धत शालेय पुस्तकांच्या वेष्टनासाठी वापरली गेली. एका तांब्याच्या दंडगोलाच्या पृष्ठावर मुद्रणप्रतिमा सूक्ष्म अशा कोरण्याने तयार करून त्यांवर शाई लावली जात असे. मुद्रणप्रतिमा रेषांच्या साह्याने तयार केलेली नव्हती पण खोलगट कोरणे फार सूक्ष्म असे. त्यामुळे त्या प्रतिमेतील शाई खोलगट भागात स्थिर राहत असे. ही शाई नंतर कागदावर उतरत असे. मात्र हे तंत्र साध्या चित्रांपुरतेच वापरण्यास योग्य होते.


शिलामुद्रण : (लिथोग्राफी). मुद्रण तंत्राचा तिसरा प्रकार म्हणजे शिलामुद्रण. या तंत्राचा विकास एकोणिसाव्या शतकात पुष्कळच झाला. शिलामुद्रणाचे तंत्र उठाव मुद्रण किंवा उत्कीर्ण मुद्रणापेक्षा वेगळे होते. पाणी व तेल (ग्रीज) एकमेकांत मिसळत नाही या तत्त्वावर आधारित असे हे समपृष्ठ मुद्रणाचे तंत्र त्यामध्ये विकसित झाले. १७९६ मध्ये प्राग येथील आलोयूस झेनेफेल्डर यांनी शिलामुद्रणाचा शोध लावला. त्यांनी सूक्ष्म एकजिनसी सच्छिद्रता असलेल्या सपाट पृष्ठभागाच्या चुनखडकाचा याकरिता उपयोग केला. या दगडाच्या पृष्ठभागावर प्रथम त्यांनी तेलकट शाईने रेखाचित्र काढले. नंतर पृष्ठभाग पाण्याने ओला केला व कुंचल्याने त्यावर मुद्रणाची शाई लावली. ही शाई फक्त रेखाचित्रावरच पकडली गेली. नंतर या दगडावर कागद दाबून काढल्यावर रेखाचित्र कागदावर मुद्रित झाले. झेनेफेल्डर यांनी प्रयोगाने असेही दाखवून दिले की, अशा दगडावर काढलेले व कागदावर छापलेले चित्र दुसऱ्या दगडावर स्थानांतरित करता येते आणि त्याच्या पाहिजे तितक्या एकसारख्या प्रती मोठ्या दगडावर शेजारी शेजारी काढता येतात. या दगडावरून एकाच मोठ्या कागदावर एकाच वेळी अनेक प्रती मिळविता येतात. जस्ताच्या पत्र्याचे गुणधर्म साधारणपणे चुनखडकाशी मिळतेजुळते असतात, हेही झेनेफेल्डर यांनीच दाखवून दिले.

झेनेफेल्डर यांनी शिलामुद्रणाच्या तत्वाचा उपयोग करणाऱ्या एका यंत्राची कल्पना मांडली. या यंत्रावर वरील प्रकारचा दगड एका सपाट पाट्यावर पक्का बसवून त्याला शाई लावून त्यावरून दंडगोलाच्या साह्याने कागद त्यावर दाबून मुद्रण करण्याची योजना पुढे आली. १८५० पर्यंत असे यंत्र तयार झाले. त्यात कागद दाबण्यासाठी दंडगोल, पाणी व शाई लावण्यासाठी खास तयार केलेले रूळ यांची योजना केलेली होती ; नंतर दगडाची जागा जस्ताचा पत्रा घेऊ शकेल याची कल्पना प्रत्यक्षात आल्यामुळे अखंड गतीने दंडगोल फिरत असताना त्यावर कागद छापण्यासाठी यंत्र करण्याची कल्पना साकार झाली. १८६८ मध्ये एका दंडगोलावर मुद्रणप्रतिमेचा पत्रा व दुसऱ्या तशाच दंडगोलाने या पत्र्यावर कागद दाबणे या क्रिया अखंड गतीने चालू ठेवणे शक्य झाले.

से तयार करणे : याच काळात रेखाचित्राचे किंवा छायाचित्राचे अम्लकोरण करून ठसा करून त्याचा अक्षराच्या खिळ्यांबरोबर त्याची छपाई करण्याचे तंत्र विकसित झाले व हे तंत्र प्रत्यक्षात आणण्यामध्ये बऱ्याच संशोधकांचा हातभार लागला. छाया-मुद्रालेखन या क्रियेचे सामान्य स्वरूप म्हणजे धातूच्या  जाड पत्र्यावर प्रथम मुद्रण प्रतिमा रासायनिक क्रियेने कोरून मुद्रणप्रतिमेला उठाव आणणे आणि उरलेली भाग कोरून खालच्या पातळीला घालविणे आणि अशा मुद्रणप्रतिमेवरून उठाव मुद्रणाच्या पद्धतीने मुद्रण करणे असे आहे.

या सर्व क्रियांमध्ये प्रकाशक्रिया महत्त्वाची असल्याने त्याला छायामुद्रालेखन किंवा ठसे करणे असे म्हणणे आवश्यक आहे. उठाव मुद्रणाशी संबंधित अशी ही क्रिया असल्याने ती उत्कीर्ण मुद्रणापेक्षा वेगळी आहे. हे लक्षात घेणे जरूर आहे. दोन्हीही तंत्रांमध्ये रसायनांच्या साह्याने अम्लकोरण होऊन पत्र्यावर प्रतिमा तयार होते. उठाव मुद्रणामध्ये पत्र्यावरील नको असलेले भाग अम्लकोरणाने काढून टाकले जातात आणि उत्कीर्ण मुद्रणांच्या तंत्रात मुद्रणप्रतिमेचे भाग अम्लकोरणाच्या साह्याने काढून टाकले जातात. उठाव मुद्रणासाठी जो पत्रा वापरला जातो तो एका लाकडी ठोकळ्यावर प्रथम ठोकून इतर अक्षरांबरोबरच अशा ठशाचे मुद्रण केले जाते.

नेकरंगी मुद्रणही अशा ठशांच्या साह्याने करता येते. त्यासाठी मूळ रंगीत चित्रावरून प्रथम चार व्यस्त प्रती (ज्यात मूळ चित्रातील छायांकित भाग पारदर्शक आणि प्रकाशित भाग गर्द व अपारदर्शक असतो अशा प्रती) तयार कराव्या लागतात. या व्यस्त प्रतींचा उपयोग चार ठसे करण्यासाठी केला जातो. या ठशांच्या अचूकपणासाठी त्यांच्या रंगछटांमध्ये सुधारणा कराव्या लागतात व अशा सुधारित ठशांवरून चार रंगांमध्ये चित्र मुद्रित करावे लागते. ठसा पूर्ण होईपर्यंत त्याला तीन वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जावे लागते. प्रथम मूळ चित्रावरून कॅमेऱ्याच्या साह्याने रंग विलगीकरणाचा उपयोग करून चार व्यस्त प्रती तयार करणे. नंतर या चार रंगाच्या व्यस्त प्रतींवरून जस्त, तांबे वगैरेंच्या पत्र्यांच्या तुकड्यांवर मुद्रणप्रतिमा स्थानांतरित करणे. शेवटी या चारही रंगांच्या छायाछटांचे बिंदू सुधारून त्याच वेळी त्यांचे अम्लकोरण करणे. एकरंगी ठशामध्ये एकाच रंगाच्या छायाछटा सुधारून घ्यावा लागतात. मात्र अनेकरंगी मुद्रणामध्ये रंग मिसळून छटा बदलत असल्याने त्याबाबत जास्त जागरूक रहावे लागते. अम्लकोरणाबरोबर इतर अनेक रसायने वा तंत्रात वापरावी लागतात. यांत्रिक क्रियाही बऱ्याच प्रमाणात वापरल्या जातात. या तंत्राच्या सुरुवातीला बहुतेक सर्व क्रिया हाताने कराव्या लागत. अलीकडील काळात स्वयंचलित क्रियांचा पुष्कळच उपयोग केला जात आहे.

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...