Saturday 7 September 2013

मुद्रणयोजनेचा शोध

मुद्रणयोजनेचा शोध : मुद्रा, मातृका व शिशाचा संयुक्त उपयोग करून टिकाऊ अशी अक्षरे (सुटी) मोठ्या संख्येने तयार करणे व प्रत्येक अक्षर (एकाच अक्षराचे सर्व नमुने) दिसायला सारखे असणे ही यूरोपमध्ये पुस्तके मुद्रित करण्याच्या दृष्टीने एक मोठी गरज होती. दुसरी मोठी गरज म्हणजे मोठ्या प्रमाणावर मुद्रण करण्यासाठी एका विशिष्ट यंत्राची जरूरी होती. अशा यंत्राची कल्पना पूर्वेकडील कुठल्याही देशातील लोकांना प्रथम सुचली नव्हती.

योहान गूटेनबेर्क यांना वरील दोन्ही नवीन कल्पनांचे श्रेय दिले जाते पण त्यातही थोडी अनिश्चितता आहे आणि या कल्पना प्रत्यक्षात आल्यानंतर लवकरच त्यांच्या श्रेयाबद्दल मतभेद उत्पन्न होऊन त्याबद्दल वाद उत्पन्न झाला. गूटेनबेर्क यांनी मुद्रित केलेल्या कुठल्याही पुस्तकावर किंवा इतर कागदांवर त्यांच्या नावाचा उल्लेख नाही, ही वस्तुस्थिती आहे. ४२ ओळींच्या बायबलसारख्या उत्कृष्ट कृतीवर त्यांचे नाव नाही; पण इतर काही ग्रंथांवर त्यांचे नाव असल्याने त्याचे श्रेय त्यांना मिळाले होते. काही ऐतिहासिक व तांत्रिक संशोधनानंतर बायबलमुद्रित करण्याचे श्रेय त्यांना देण्यात आले. गुटेनबेर्क यांचा मूळ व्यवसाय चांदीच्या कारागिराचा होता. त्यांनी योहान फूस्ट यांच्याबरोबर जर्मनीमध्ये माइनत्स येथे जो मुद्रणाचा व्यवसाय भागीदारीमध्ये सुरू केला त्यामध्ये त्यांनी फक्त अभिकल्पक (आराखडा तयार करणारा) भागीदार म्हणून काम केले. त्यामुळे या पुस्तकावर त्यांचे नाव दिले गेले नाही. नंतर गूटेनबेर्क यांनी १४५५ मध्ये त्यांच्या सहका-यांविरूद्ध खटला भरला आणि त्यात ते हरले. या खटल्याच्या संदर्भातील काही कागपत्रांमधील उल्लेखांवरून त्यांनी बायबल छापण्याचे काम केले, असे अनुमान काढले गेले आहे.

गूटेनबेर्क यांच्या निधनानंतर बरीच कागदपत्रे प्रसिद्ध झाली व त्या सर्वावरून मुद्रणाच्या शोधाचे श्रेय त्यांच्याकडे जाते. त्यांच्या विरूद्ध या शोधावर हक्क सांगणारे योहान शफर (योहान फूस्ट यांचे नातू) यांनीच अप्रत्यक्षपणे गूटेनबेर्क यांच्या बाजूने ही गोष्ट मान्य केली आहे. १५०९ नंतर योहान शफर यांनी चल अक्षरांचा व मुद्रणाचा शोध फक्त त्यांच्या वडिलांनी (पेटर शफर यांनी) व आजोबांनी लावला होता असा हक्क सांगायला सुरूवात केली; पण त्याआधी १५०५ मध्ये एका पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये १४५० मध्ये माइनत्स येथे गुटेनबेर्क यांनी चल अक्षरांचा व मुद्रणाचा शोध लावला असे शफर यांनीच लिहिले होते. त्यांनी त्यांच्या आजोबांकडून याबाबत माहिती घेतली असली पाहिजे, असे अनुमान आहे. त्यांचे आजोबा १४६६ मध्ये निधन पावले व वडील १५०२ मध्ये निधन पावले. त्यानंतर १५०९ च्या सुमारास योहान शफर यांनी आपलेच शब्द फिरवून गूटेनबेर्क यांचे श्रेय हिरावून घेण्याचा प्रयत्न केला; पण त्याचे कारण मात्र समजत नाही.

सुरवातीला अक्षरांच्या खिळ्यांचे उत्पादन पुढे दिलेल्या पद्धतीने झाले असावे अशी समजूत आहे. अक्षराचा ठसा प्रथम पितळी किंवा काशाच्या पृष्ठावर कोरला जातो. नंतर त्यावर शिशाचा रस ओतून त्याची मातृका तयार करण्यात येते व त्याच्या साच्यात एक मिश्रधातू ओतून त्यातून अक्षरे तयार करण्यात येतात. या खिळ्यांचे ð वर्णपटविज्ञानीय विश्लेषण केल्यानंतर असे आढळले की, या जुन्या खिळ्यांच्या मिश्रधातूमध्ये शिसे, कथिल व अँटिमनी यांचा उपयोग केला होता. सध्याही याच धातूंचा उपयोग केला जातो. शिशाचे ऑक्सिडीकरण (ऑक्सिजनाशी संयोग होण्याची क्रिया) लवकर होऊ नये म्हणून त्यात कथिल मिसळले जाते. खिळे तयार करताना शिशाच्या मातृकांवर हवेत परिणाम होवून त्या ठिसूळ होऊ नयेत म्हणूनही कथिलाचा त्यात उपयेग केला जातो. शिसे व कथिल या दोनच धातूंच्या मिश्रणात टिकाऊपणा व कडकपणा येऊ शकत नाही म्हणून अँटिमनी मिसळली जाते.

. स. १४७५ च्या सुमाराला अक्षरांच्या पोलादी मुद्रा तयार करण्याची कल्पना सुचली. त्याआधी नरम धातूच्या मुद्रा वापरल्या जात. पेटर शफर यांनी पोलादी मुद्रा तयार करण्याची कल्पना सुचविली. पोलादी मुद्रेवरुन तांब्याच्या मातृका तयार केल्यास त्यांच्या साह्याने तयार केलेले आक्षरांचे खिळे जास्त एकसमान मिळतील या कल्पनेतून पोलादी मुद्रा तयार करण्याची कल्पना सुचली. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अक्षरांचे खिळे सर्वासाधारणपणे वर दिलेल्या पद्धतीने तयार केले जात.

मृद्रणयोजनाकाराचे काम साधारणपणे चार भागांत विभागलेले असते. (१) अक्षरांचे खिळे त्यांच्या कप्प्यांमधून एक एक काढून घेणे. (२) अक्षरजुळणीसाठी वापरली जाणारी पट्टी (स्टिक) हातात धरून तीत अक्षरांच्या ओळी तयार करणे. ही पट्टी प्रथमतः लाकडाची व नंतर धातूची वापरण्यात येऊ लागली. (३) शब्दांमधील अंतर व्यवस्थित करुन ओळीची लांबी पूर्ण करणे. त्यासाठी दोन शब्दांमध्ये शिशाच्या को-या (अक्षरविरहित) पट्ट्या जरूरीप्रमाणे घालणे. (४) मजकुरांचे मुद्रण पूर्ण झाल्यानंतर अक्षरांचे खिळे सुटे करुन अक्षरांच्या कप्प्यांत प्रत्येक अक्षर परत टाकणे (वितरण करणे).

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...